
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगरपरिषद प्रभाग क्र. ११ मधिल शिंदेचे शिलेदार शशिकांत किणी आणि प्रणाली पाटील यांनी आपल्या प्रभागात निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून,प्रणाली पाटील ह्या माजी नगरसेविका अनिता किणी यांची प्रस्तावित असलेली कामे पूर्ण करणार असून महिला सक्षमीकरणा साठी काम करणार आहेत. तसेच शशिकांत किणी हे आपल्या प्रभागात क्षेत्रीय सभा घेण्यावर भर देणार असून नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर नगरपरिषदेत आवाज उचलणार आहेत.आणि त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.




