पालघर पोलीस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. पालघर पश्चिमेतील मौजे माहिम परिसरात एका रहिवासी इमारतीत अनधिकृतरित्या बोगस कॉल सेंटर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
या कारवाईत पाच आरोपी रंगेहाथ आढळून आले. तपासात आरोपी अमेरिकेतील नागरिकांची वैयक्तिक माहिती बेकायदेशीररित्या मिळवून स्वतःला मायक्रोसॉफ्ट व अॅपल कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ओळख देत होते. “तुमच्या डिव्हाईसमध्ये व्हायरस आहे” अशी भीती दाखवून गिफ्ट कार्ड खरेदीस भाग पाडले जात होते.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
• चार लॅपटॉप (सुमारे ₹५,७२,००० किंमत)• बारा मोबाईल फोन
• चार हेडफोन
• एक राऊटर
• एक डोंगल
फसवणुकीतून मिळालेली रक्कम डिजिटल चलनात रूपांतरित करून हवालामार्गे रोख स्वरूपात घेतली जात होती, असा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.
भरत लोकु लालवानी (वय ३५, मिरारोड, जि. ठाणे)
रोहीत राजेंद्र निंबाळकर (वय २९, नायगाव, जि. पुणे)
रोहीत मिलींद झोऱ्हे (वय २३, मिरारोड, जि. ठाणे)
अमरदीप अंग्रेज गिल (वय २४, मुळ रा. मोहाली, पंजाब)
सागर बलदेव पाठडिया (वय २९, सुरत, गुजरात)


