क्रीडा

मोहोट्याचापाडा येथे ‘शिव छत्रपती चषक २०२६’ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Share News

भव्य शिव छत्रपती चषक २०२६ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मोहोट्याचापाडा, ता. वाडा | जि. पालघर

वाडा तालुक्यातील मोहोट्याचापाडा येथे ‘गांवदेवी यंग स्टार मोहोट्याचापाडा’ यांच्या वतीने भव्य शिव छत्रपती चषक २०२६ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २६, २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, खेळाडूंमध्ये क्रीडास्पर्धेची भावना वाढीस लागावी आणि तरुणाईला सकारात्मक दिशा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आकर्षक बक्षिसे १,११,१११ रुपये ५१,१११ रुपये २५,१११ रुपये २५,१११ रुपये
Shiv Chhatrapati Cricket Cup 2026

🏆 आकर्षक बक्षिसे

विजेता संघ : ₹१,११,१११/- द्वितीय क्रमांक : ₹५१,१११/- तृतीय क्रमांक : ₹२५,१११/- चतुर्थ क्रमांक : ₹२५,१११/-

चारही संघांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

विशेष पारितोषिके : उत्कृष्ट फलंदाज – बॅट उत्कृष्ट गोलंदाज – शूज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – शूज

सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हद्वारे होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क :
सौरभ पाटील – ९१६८३०८८८९
कुणाल पाटील – ९०७५४८४२०६
प्रफुल्ल (बंटी) पाटील – ८९९९७२१७४९
अनिकेत पाटील – ८६९८६३३५६५
ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असून क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी आकर्षित ठरेल.
– प्रतिक सुरेश पाटील
स्थापत्य अभियंता, मोहोट्याचापाडा

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *